Gadchiroli: दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, धोडराजच्या घनदाट जंगलात कारवाई

By संजय तिपाले | Published: July 9, 2024 07:47 PM2024-07-09T19:47:52+5:302024-07-09T19:48:26+5:30

Gadchiroli News: निरपराध व्यक्तीचा खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोडराजच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दुकलीवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते.

Gadchiroli: Two Jahal Maoists arrested with a reward of 10 lakhs, operation in dense forest of Dhodraj | Gadchiroli: दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, धोडराजच्या घनदाट जंगलात कारवाई

Gadchiroli: दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, धोडराजच्या घनदाट जंगलात कारवाई

- संजय तिपाले

गडचिरोली - निरपराध व्यक्तीचा खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोडराजच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दुकलीवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते.

माओवादी चळवळीत ॲक्शन टीम कमांडर पदावर काम करणारा रवि मुरा पल्लो (३३,रा. कवंडे ता. भामरागड), भामरागड दलम सदस्य  दोबा काेरके वड्डे (३१,रा. कवंडे ता. भामरागड) अशी त्यांची नावे आहेत. रविवर ८ लाखांचे तर दोबावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाखांचे बक्षीस होते.

धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. यावेळी दोन संशयित माओवादी  धोडराज ठाणे हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सापळा रचून जंगलातून त्यांना अटक केली.  नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली होती. यात त्या दोघांचा सक्रिय सहभाग   असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक यतीश देशमुख , कुमार चिंता , एम. रमेश, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

दोबावर १८, रविवर ६ गुन्हे
दोबा वड्डे हा २००८ पासून हस्तक म्हणून माओवाद्यांसाठी काम करायचा. २०१९ मध्ये तो भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. त्याच्यावर खुनाचे ७, चकमकीचे ५ व इतर ६ असे एकूण १८ गुन्हे नोंद आहेत. २०२२ मध्ये नेलगुंडातील राजेश आत्राम व २०२३ मध्ये पेनगुंडातील दिनेश गावडे या निरपराध व्यक्तींच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  

रवि पल्लो हा २०१६ पासून नक्षल चळवळीशी जोडला गेला. २०१८ पासून ॲक्शन समितीत तो सहभागी झाला. पुढे त्यास टीम कमांडर म्हणून बढती मिळाली. त्याच्यावर ६ गुन्हे नोंद असून त्यात चकमक, जाळपोळीसह स्फोटाचे प्रत्येकी एक व खुनाच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. 

Web Title: Gadchiroli: Two Jahal Maoists arrested with a reward of 10 lakhs, operation in dense forest of Dhodraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.