गडचिरोलीतील प्रकार : आरटीओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; परिवहन आयुक्तांच्या सूचनेनंतरही थांबा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 01:45 AM2016-02-12T01:45:55+5:302016-02-12T01:45:55+5:30
खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब...
गडचिरोलीतील प्रकार : आरटीओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; परिवहन आयुक्तांच्या सूचनेनंतरही थांबा सुरूच
गडचिरोली : खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने सोमवारी एसटी स्टँडच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. मात्र न्यायालयाच्या या आदेशाची गडचिरोली शहरात राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत थांबे असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचा वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे एसटीच्या थांब्यावरूनच खासगी वाहनचालक सर्रासपणे प्रवाशांची उचल करीत असल्याचे दिसून येत आहे.