Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत युवकाने वाटले घरातले धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 01:25 PM2020-03-26T13:25:16+5:302020-03-26T13:25:40+5:30
कोरोनामुळे बंदिस्त झालेल्या नागरिकांसोबतच भटक्याविमुक्त जमातींचेही हाल होत असलेले पाहून एका युवकाने घरातील धान्याची पोती बाहेर आणून या नागरिकांना वाटून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरोनामुळे बंदिस्त झालेल्या नागरिकांसोबतच भटक्याविमुक्त जमातींचेही हाल होत असलेले पाहून एका युवकाने घरातील धान्याची पोती बाहेर आणून या नागरिकांना वाटून दिली. हे औदार्य दाखवणारा या युवकाचे नाव प्रमोद भगत असून तो येथील माजी पंचायत समिती सदस्य आहे.
गडचिरोलीत वास्तव्याला असलेल्या भटक्या जमातीच्या तांड्याने गावाबाहेर आपली पालं टाकली होती. गावातील दुकाने बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली होती. त्यांच्या पालांमध्ये स्त्रिया व लहानमुलेही होती. ही माहिती कळताच प्रमोद भगत यांनी आपल्या घरात असलेले तांदूळ व गव्हाची पोती तेथे नेऊन सर्वांमध्ये वितरीत केली. त्यांच्या या औदार्याचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.