रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सरसावले गडचिरोलीकर युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात गडचिरोलीकर युवकांसह विविध कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. दुसºयाला जीवनदान देणाºया या रक्तदानाच्या पवित्र कार्यासाठी आपण सदैव तयार असून प्रत्येक हाकेला धावून येणाचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित या शिबिराची सुरूवात बाबुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हसनअली गिलानी, सामाजिक कार्यकर्ते विनायक बोरकर, ओबीसी महासंघाचे रुचित वांढरे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.शैलजा मैदमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले रक्तदान दुपारी ३ पर्यंत सुरू होते. कोरोनाच्या सावटात सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात होती. सर्व दात्यांना लगेच डोनर कार्ड आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरासाठी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, सोनिया बैस, नलिनी बोरकर, लोकमतचे दिगांबर जवादे, गोपाल लाजुरकर, श्रीरंग कस्तुरे, विकास चौधरी, निलेश धाईत तथा रक्तपेढीचे तंत्रज्ञ सतीश तडकलावार आदींनी सहकार्य केले.
२४ वेळा केले रक्तदान
लोकमतने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची बातमी वाचून येथील शासकीय तंत्रनिकेतनचे कर्मचारी रोशन गुलाबराव वाघमारे रक्तदान करण्यासाठी आले. त्यांचे हे २४ वे रक्तदान असल्याचे समजताच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यापूर्वी ठाणे व इतर ठिकाणी असताना त्यांनी वेळोवेळी रक्तदान केले आहे.