गडचिरोलीत कापड दुकानदारांवरही मंदीच
By admin | Published: November 11, 2016 01:22 AM2016-11-11T01:22:51+5:302016-11-11T01:22:51+5:30
गडचिरोली शहरात बुधवारी गुमास्ता दिवस असल्याने बहुसंख्य कापड दुकान बंद होते. गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच
नोटा रद्द झाल्याचा परिणाम : शेकडो ग्राहक नोटांसह परतले
गडचिरोली : गडचिरोली शहरात बुधवारी गुमास्ता दिवस असल्याने बहुसंख्य कापड दुकान बंद होते. गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच कापड दुकानात १००० व ५०० च्या नोटा घेऊन महिला व पुरूष ग्राहक येत होते. मात्र दुकानदारांनी ५०० व १००० च्या नोटा घेण्यास नकार दिल्याने शहरातील मोठ्या कापड दुकानातून अनेक ग्राहक परत गेले.
येथील त्रिमूर्ती चौकात असलेल्या बि-फॅशन प्लाझा दुकानाचे संचालक शैलेश देवकुले, मनोज देवकुले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जवळजवळ सकाळपासून १० ग्राहक परत गेले. आपल्याकडे एटीएम कार्ड लावण्यासाठी मशीनची व्यवस्था आहे. मात्र कुणीही या आधारे खरेदी करण्यास तयार नव्हते. १००० व ५०० च्या नोटा घ्या, असा आग्रह ग्राहकांचा होता. त्यामुळे अनेकांना परतच जावे लागले. तसेच शहरातील परिधान कापड दुकानाचे मालक अकबर हुसैन वडसरीया यांनीही ५०० व १००० च्या नोटा आम्ही स्वीकारत नाही. त्यामुळे ग्राहक नाही, अशी माहिती दिली. दिवाळीत उधारीत कपडे खरेदी केलेला एक ग्राहक १००० व ५०० च्या नोटा घेऊन तीन हजार रूपये देण्यासाठी आला. मात्र आपण त्याला विनम्रतेने नोटा घेण्यास नकार दिला. नगदी पैसे घेऊन चलनातील नोटा आम्ही स्वीकारत आहो, अशी माहिती वडसरीया यांनी दिली. एकूणच कापड बाजार पूर्णपणे थंड पडलेला होता. नोटा रद्द झाल्यामुळे महिला व मुली हेच ग्राहक कापड खरेदीसाठी दुकानात येत असल्याचे दिसून आले. मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला.