गाडगेबाबांचे विचार अंगिकारा
By admin | Published: December 26, 2015 01:41 AM2015-12-26T01:41:25+5:302015-12-26T01:41:25+5:30
संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी झटले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रहार केला.
पुण्यतिथी सोहळा : विजय गोरडवार यांचे समाजबांधवांना आवाहन
गडचिरोली : संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजाच्या उत्थानासाठी झटले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरितींवर प्रहार केला. त्यांचे विचार अंगिकारुन समाजाने आपली प्रगती करावी, असे आवाहन गडचिरोली नगर परिषदेचे वित्त व नियोजन सभापती विजय गोरडवार यांनी केले. स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजित संत गाडगेबाबा यांच्या ५९ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी गोरडवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर गडपायले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जयंत भिलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील वरघंटे, चामोर्शी नगरपंचायतीच्या नगरसेविका रोशनी वरघंटे, सुभाष रोहनकर, अरुण केळझरकर, रमेश गड्डमवार, मोरेश्वर मानपल्लीवार, दामोदर एम्पल्लीवार, लक्ष्मणराव पापडकर, संगीता गडपायले, लता वरघंटे, निलीमा केळझरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांचा आदर्श समाजाने समोर ठेवावा, त्यांचे कार्य सदोदित पुढे नेण्यास पुढाकार घ्याव, असे आवाहन प्रभाकर गडयपायले यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. याप्रसंगी रोशनी वरघंटे व स्वप्नील वरघंटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय यापाकुलवार तर संचालन नितेश गट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तू केळझरकर, सुरेश तुंगीडवार, अशोक कोलटकर, रमेश गडपायले, दिलीप पेंदोरकर, दीपक ताडपल्लीवार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)