मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:24 AM2021-06-23T04:24:20+5:302021-06-23T04:24:20+5:30
या चर्चेदरम्यान गडकरी यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक नंदिनी शाहू यांना हे थंडबस्त्यात असलेले जीर्णोद्धाराचे काम लवकर सुरू ...
या चर्चेदरम्यान गडकरी यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक नंदिनी शाहू यांना हे थंडबस्त्यात असलेले जीर्णोद्धाराचे काम लवकर सुरू करण्याबाबत निर्देश दिले. याआधी २८ नोव्हेंबर २०२० रोजी गडकरी यांना जीर्णोद्धारासाठी निधीची व बांधकाम लवकर करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत मंत्री गडकरी यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद शिंदे यांना निवेदन देऊन ही समस्या तातडीने निकाली काढण्यास कळविले होते.
या चर्चेप्रसंगी समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सहसचिव रामूजी पाटील तिवाडे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
(बॉक्स)
पाच वर्षांपासून रखडले काम
या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या ५ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सन २०१५ मध्ये मार्कंडेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यातील मंदिर पुनर्बांधणीकरिता खोलण्यात आले. त्यानंतर २०१६ मध्ये प्रत्यक्षात कामाची सुरुवात करण्यात आली; परंतु पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही अजूनपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही.
===Photopath===
220621\img-20210622-wa0058.jpg
===Caption===
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी त्यांच्यासोबत चर्चा करताना श्री मारकंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर