गाेटूल भवन आदिवासींसाठी प्रेरणादायी ठरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:47+5:302020-12-26T04:28:47+5:30
गडचिराेली : आदिवासींना प्रेरणा देणारी, संस्कृतीचे जतन करणारी तसेच चालीरीती, बोलीभाषेची जपणूक करणारी गडचिरोलीतील ही गाेटूलभूमी आहे. गेल्या ३०-३५ ...
गडचिराेली : आदिवासींना प्रेरणा देणारी, संस्कृतीचे जतन करणारी तसेच चालीरीती, बोलीभाषेची जपणूक करणारी गडचिरोलीतील ही गाेटूलभूमी आहे. गेल्या ३०-३५ वर्पांसून या भूमीवर आदिवासींचे कार्यक्रम होत आहेत. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर येथे मोठी वास्तू निर्माण होणार आहे. ही वास्तू आदिवासींकरिता प्रेरणादायी ठरावी, असा आशावाद खा. अशोक नेते यांनी व्यक्त केला.
गडचिरोली गोटुल समिती, आँल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चांदाळा मार्गावर गाेटूल भूमीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बाेलत हाेते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे हाेते. यावेळी आ. डाॅ. देवराव हाेळी, भाजप अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, अधीक्षक अभियंता शालिक उसेंडी, उपअभियंता माधव गावळ, प्रकाश मडावी, वर्षा शेडमाके, मोहन गावडे, रमेश गेडाम, भरत येरमे, सदानंद ताराम, अमर गेडाम, दिलीप उसेंडी, शालिक मानकर, माेहन पुराम व समाजबांधव उपस्थित होते. गाेवारींना आदिवासींचे जात प्रमाणपत्र न देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
बाॅक्स ......
आदिवासी समाजाने संस्कृती जाेपासावी
अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर चांदाळा मार्गावरील गाेटूल भूमीवर बांधकाम केले जाणार आहे. या भूमीच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपली संस्कृती जाेपासावी. समाजाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहाेत, असे आश्वासन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी याप्रसंगी नागरिकांना दिले.