गाेटुल समितीतर्फे कर्मचाऱ्यांकडून ‘आदिवासी दिन’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:42 AM2021-08-13T04:42:02+5:302021-08-13T04:42:02+5:30

कार्यक्रमादरम्यान सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना मालार्पण करण्यात आले. नवनियुक्त व उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार ...

Gaitul Samiti celebrates 'Tribal Day' by its employees | गाेटुल समितीतर्फे कर्मचाऱ्यांकडून ‘आदिवासी दिन’ साजरा

गाेटुल समितीतर्फे कर्मचाऱ्यांकडून ‘आदिवासी दिन’ साजरा

Next

कार्यक्रमादरम्यान सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना मालार्पण करण्यात आले. नवनियुक्त व उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार झालेल्या शिक्षकांमध्ये नीलेश वेलादी, एकनाथ टेकाम, अशोक मडावी, सुभाष कुलसंगे, बेबी नैताम, केदार कुमरे, सुरेश सिडाम, विश्वनाथ पेद्दाला, वनरक्षकांमध्ये विजू मडावी, पंकज कोडापे, सुनीता वेलादी, लक्ष्मी वेलादी, सुनंदा तुमरेटी व पी. व्ही. पोटावी, महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नीळकंट कुळसंगे, विजय करपते, पांडुरंग कुळसंगे, सतीश वेलादी, संजू सिडाम, तलाठी वैशाली मडावी, अश्विनी सडमेक, मच्छिंद्र पदा; कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेश गावडे, प्रेमचंद शेडमाके, ज्ञानेश्वर पुडो; तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रायसिडाम व माधवी उईके तसेच सांस्कृतिक ग्रुपमध्ये स्टार लिंगो सांस्कृतिक ग्रुप झिंगानूर, (संतोष गावडे व पूजा कुळमेथे), जय सेवा सांस्कृतिक ग्रुप गर्कापेठा व मल्लेश कुळमेथे सांस्कृतिक ग्रुप आयपेठा (सारंगा दरिया) यांचा शिल्ड, प्रमाणपत्र व पिवळा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Gaitul Samiti celebrates 'Tribal Day' by its employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.