गजानन गेडाम करणार अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:40 AM2021-08-24T04:40:31+5:302021-08-24T04:40:31+5:30
गडचिराेली : जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका (पुरुष) पदावर कार्यरत असलेल्या गजानन भिकाजी गेडाम हे स्वत:चे शरीराचे सर्वच अवयवदान करणार ...
गडचिराेली : जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका (पुरुष) पदावर कार्यरत असलेल्या गजानन भिकाजी गेडाम हे स्वत:चे शरीराचे सर्वच अवयवदान करणार असून, याबाबत त्यांनी नॅशनल ऑरगन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लाॅन्ट ऑर्गनायझेशन या संस्थेला त्यांनी लिहून दिले आहे.
१३ ते २० ऑगस्ट या कालावधीत जागतिक अवयदान सप्ताह म्हणून साजरा केला जाते. या कालावधीत अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते. गजानन गेडाम हे आराेग्य विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व त्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. किडणी, हृदय, लिव्हर, लंग्स आदी अवयवदान केले आहेत. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी सविता गजानन गेडाम व सर्व कुटुंबीयांनी सहमती दर्शविली आहे. गेडाम यांनी नागरिकांसमाेर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.