गणेश मंडळाने बुजविले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:47 PM2017-09-04T22:47:27+5:302017-09-04T22:47:45+5:30
अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे.
अहेरी शहरातील मुख्य रस्ता, उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात घडत होते. परिणामी वाहनधारक कमालीचे त्रस्त होते. अहेरी येथील आझाद गणेश मंडळ लोेकोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रसिद्ध आहे. यावर्षी या मंडळाने अहेरी शहरातील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या पदाधिकाºयांनी स्वत: काम करीत खड्डे बुजविले. सदर खड्डे बुजविण्यासाठी नगर पंचायतीला किमान ५० हजार रूपयांचा खर्च आला असता, मात्र हे काम आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी लोकवर्गणीतून गोळा झालेल्या पैशातून मोफत केले आहे. या उपक्रमात अहेरीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, आझाद गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेविका अर्चना विरगोनवार, नगरसेवक शैलेंद्र पटवर्धन, गिरीश मद्देर्लावार, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, महेश बेझंकीवार, लचय्या गद्देवार, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, संतोष जोशी, अहेरी व्यापारी मंडळाचे प्रशांत आर्इंचवार, कारूसेठ रोहरा, दोंतुलवार, ंबबलू येनमवार, अनुराग बेझलवार, मयूर गुम्मलवार, संदीप गुम्मलवार, मयूर चांदेकर, अक्षय कवीराजवार, सचिन मल्लेलवार, मोनू पारेल्लीवार, अमोल वडनेरवार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
गणेशोत्सवासाठी बहुतांश पैसा लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा केला जातो. मात्र सदर पैसा डीजे, विद्युत रोषणाई, बँड, दारू यासारख्या अनावश्यक बाबींवर खर्च केला जातो. या सर्व खर्चाला फाटा देत आझाद गणेश मंडळाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा निर्णय अतिशय प्रेरणादायी ठरला आहे.
आष्टीत डीजेविनाच विसर्जन
आष्टी येथे चार वॉर्डात सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डीजे व बँडवर लाखो रूपयांची उधळपट्टी होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. त्यामुळे यावर्षी डीजे किंवा बँडविनाच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. विसर्जनादरम्यान पारंपरिक वाद्य वाजविले जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला आष्टी येथील नवतरंग गणेश मंडळ, शहीद वीर भगतसिंग गणेश मंडळ, श्री साई गणेश मंडळाने सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. यावेळी आष्टीचे ठाणेदार दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे, संदीप कापडे, संदीप शिंगटे, विजय जगदाडे, अशोक खंडारे आदी उपस्थित होते. आष्टी येथील गणेश मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत होत आहे.