आरमाेरीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जाते गणेशाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:43 AM2021-09-10T04:43:59+5:302021-09-10T04:43:59+5:30
गणपतीची मूर्ती जमिनीत आहे, असे स्वप्न आरमोरी येथील काशिनाथ बेलदार यांना पडले. नागरिकांनी प्रत्यक्ष जमीन खोदली असता, जमिनीतून ...
गणपतीची मूर्ती जमिनीत आहे, असे स्वप्न आरमोरी येथील काशिनाथ बेलदार यांना पडले. नागरिकांनी प्रत्यक्ष जमीन खोदली असता, जमिनीतून गणपतीची मूर्ती निघाली आणि त्यानंतर बालाजी हेमके, जनार्धन हेमके, दामोदर हेमके यांच्या पुढाकाराने सन १९४५ मध्ये कवेलूचे मंदिर बाधण्यात आले आणि गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर नरसिंग गहेरवार यांच्या आर्थिक मदतीने सिमेंट काॅंक्रीटचे मंदिर बांधण्यात आले. यानंतर दिलीप हेमके, राजेश जोध, राजू अंबानी, दिलीप चिलबुले, दीपक हेमके, बापू पप्पुलवार, संजय हेमके, वामन देवीकार, हरिभाऊ तिजारे, यांच्या मदतीने मंदिर सुशोभित करण्यात आले आहे
गणेश चतुर्थीला दरवर्षी श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्या मदतीने या मंदिरात गणपती मूर्तीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी आनंद मेळावा तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जाते. उत्सव पार पाडण्यासाठी अक्षय हेमके, चंदू आकारे, नितीन जोध, प्रफुल्ल मोगरे, योगेश देविकार, आकाश हेमके, सूरज हेमके, गणेश तिजारे, सौरब हेमके, अमर हेमके, सुरेश हेमके, स्वप्निल हेमके हे सहकार्य करीत आहेत.