मालगाडीचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्यांच्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:25+5:30
९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होती. याचदरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मालगाडीचा दरवाजा उघडून त्यातील जवळपास ३० पोती गहू पळविला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गव्हाची पोती घेऊन दक्षिणेकडील धर्मापुरी येथे जात असलेल्या मालगाडीचा दरवाजा उघडून जवळपास ३० पोती गहू लांबविणाऱ्या ९ आरोपींच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेली गव्हाची पाेतीही जप्त करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, ९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होती. याचदरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मालगाडीचा दरवाजा उघडून त्यातील जवळपास ३० पोती गहू पळविला.
वडसा रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाली करून सर्व आरोपींना अर्जुनी माेरगाव येथून अटक करून रेल्वे सुरक्षा पोलिसांच्या नागभिड ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ, सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे, निरीक्षक पी.सी. शर्मा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विजय भालेकर, आरक्षक एन. बी. सुखदेवे, एल.जी. प्रसाद, विनयकुमार गौड आदींनी केली.