छत्तीसगडहून आलेला १४ लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:13 AM2023-09-12T11:13:37+5:302023-09-12T11:14:46+5:30

कारसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुरुमगाव हद्दीत कारवाई

Ganja worth 14 lakh seized from Chhattisgarh, three arrested; 21 lakh worth of goods including the car seized | छत्तीसगडहून आलेला १४ लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

छत्तीसगडहून आलेला १४ लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

googlenewsNext

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत गांजा तस्करी जोमात सुरू असल्याच्या मुद्द्याकडे 'लोकमत'ने वारंवार लक्ष वेधल्यानंतर सोमवारी धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एका कारमधून १४ लाखांच्या गांजासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय तिघांना अटक केली.

उमर फैय्याज अहमद शेख (वय २८, रा. कमला रमननगर, बेंगनवाडीजवळ रजा चौक, मुंबई), राकेश राजू वरपेटी (२६, रा. सिद्धार्थ सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर मुंबई), शहबाज सरवर खान (२७, रा. बिहाइडिंग बिल्डिंग नंबर-५३ जवळ आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबूर मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मुरुमगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक मिथुन यांना कारमधून (एमएच ०४ सीएम-२५१५) गांजा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छत्तीसगडमधून सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे निघालेली ही कार कटेझरी रोडवरील बस स्थानकासमोर सापळा लावून अडवली. पोलिस अधीक्षक नीलाेत्पल, अपर अधीक्षक अनुज तारे, यतीश देशमुख, उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्यासह सहायक निरीक्षक मिथुन सिरसाट, उपनिरीक्षक राहुल चौधरी, हवालदार नानाजी पित्तुलवार, अंमलदार दिलीप लंबुवार, ताराचंद मोहुर्ले, वाल्मीक कोटांगले, विनेश मांढरे, नितीन मडावी, वैजीनाथ मदने, दिलीप काळे, दीपक जाधव यांनी ही कारवाई केली.

डिकीत होती गांजाची तीन पोती

कारची तपासणी केली असता डिकीत तीन पोत्यांत १३ लाख ८५ हजार ८०० रुपये किमतीचा १३८ किलो गांजा आढळून आला. कारसह १३ हजारांचा मोबाइल असा सुमारे २० लाख ९८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Ganja worth 14 lakh seized from Chhattisgarh, three arrested; 21 lakh worth of goods including the car seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.