गराेदर मातेला नावेने करावे लागले भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:37+5:302021-09-03T04:38:37+5:30

सुरेखा नरोटे हिची प्रसूतीची तारीख १७ सप्टेंबर आहे. सदर महिलेचे हे तिसरे बाळंतपण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वीरीत्या यापूर्वीच्या ...

Garader's mother had to recruit by name | गराेदर मातेला नावेने करावे लागले भरती

गराेदर मातेला नावेने करावे लागले भरती

Next

सुरेखा नरोटे हिची प्रसूतीची तारीख १७ सप्टेंबर आहे. सदर महिलेचे हे तिसरे बाळंतपण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वीरीत्या यापूर्वीच्या प्रसूती झालेल्या आहेत. ३० राेजी ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला सकाळी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. वेंगनूर गावाकडे जाण्यासाठी खडीचा रस्ता आहे. मधेच कन्नमवार जलाशयाचे नाले आहेत. जलाशयात पाणी वाढल्याने नाल्याचे पाणी वाढले आहे. या गावासाठी आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी प्रशासनाकडून एक बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट राेजी बोटीतून गर्भवती महिलेला रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. आहे. सदर महिलेची तब्येत स्थिर असून, ती बाळंतपण होईपर्यंत रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहणार आहे, अशी माहिती रेगडी प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत मेश्राम यांनी दिली आहे.

Web Title: Garader's mother had to recruit by name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.