सेमाना देवस्थान परिसरात केली कचऱ्याची हाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:16+5:302021-04-01T04:37:16+5:30
आधार विश्व फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी हातात खराटे घेऊन सेमाना देवस्थान परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. स्वयंपाकाच्या अस्थायी चुलीलगतचा ...
आधार विश्व फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी हातात खराटे घेऊन सेमाना देवस्थान परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. स्वयंपाकाच्या अस्थायी चुलीलगतचा कचरा, फेकलेले प्लास्टिक ताट, वाट्या, ग्लासेस, लहान मुलांचे डायपर, बाटल्या यासह विविध कचरा सदस्यांनी वेगळा करून पोत्यात भरला आणी शिल्लक कचऱ्याची होळी केली. वृक्षाच्या मोठमोठ्या फांद्या तोडून होळी साजरी करण्यापेक्षा सर्वांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याची होळी करावी. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. देवस्थानस्थळी स्वयंपाक करताना प्लास्टिकचा कचरा तिथेच टाकून न देता कुंडीत कचरा टाकावा, दारूच्या पार्ट्या धार्मिक स्थळी करू नका, असे आवाहन आधार विश्व फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. या उपक्रमात फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे, सदस्य विजया मने, कांचन चौधरी, जयश्री चांदेकर, मीरा कोलते, सुनीता आलेवार, ऐश्वर्या लाकडे, प्रीती मेश्राम, आरती खोब्रागडे तसेच विकास अधिकारी सुशील हिंगे, तनिष्का चांदेकर, संपदा भोयर, शर्मिष्ठा चौधरी आदी सहभागी झाले होते.