गरीब व गरजू महिलांना गॅस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:00 AM2018-07-12T01:00:22+5:302018-07-12T01:04:53+5:30

परिसरातील अनेक गावातील गरीब व गरजू कुटुंब गॅस सिलिंडरपासून वंचित होते. त्यांना गॅसचा लाभ मिळावा, याकरिता प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता.

Gas allocation to poor and needy women | गरीब व गरजू महिलांना गॅस वाटप

गरीब व गरजू महिलांना गॅस वाटप

Next
ठळक मुद्देआष्टी येथे कार्यक्रम : तहसीलदार व जि. प. सदस्यांच्या हस्ते वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परिसरातील अनेक गावातील गरीब व गरजू कुटुंब गॅस सिलिंडरपासून वंचित होते. त्यांना गॅसचा लाभ मिळावा, याकरिता प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याची दखल घेऊन १० जुलै रोजी आष्टी येथे गरीब व गरजू महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
गॅस वितरण कार्यक्रमाला तहसीलदार अरूण येरचे, जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार, संजय पंदिलवार, व्यंकटी बुर्ले, डॉ. कोडापे, हरिदास टेकाम, डॉ. मैंद, बल्लूजी आत्राम उपस्थित होते.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मान्यवरांच्या हस्ते गॅस, रेगुलेटर, शेगडीचे वितरण केवळ १०० रूपयांमध्ये करण्यात आले. याचा लाभ आष्टी, इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चपराळा, चौडमपल्ली, धन्नूर, चंदनखेडी, मार्र्कंडा कंसोबा, बामनपेठ, अनखोडा, कढोली, कोनसरी, चंदनखेडी, उमरी आदी गावातील अंत्योदय, बीपीएल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वननिवासी लाभार्थ्यांना देण्यात आला.
महिलांनी नियमित गॅस सिलिंडरचा वापर करावा, तसेच वापर करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांच्या वतीने लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Gas allocation to poor and needy women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.