माेहझरीत गॅस सिलिंडर सुविधा ठरली कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:22+5:302021-03-05T04:36:22+5:30
गडचिराेली : शहरात एचपी व भारत या दाेन्ही गॅस एजन्सी आहेत. एजन्सीच्या वतीने घरपोच गॅस सिलिंडर पाेहाेचण्याची सुविधा देण्यात ...
गडचिराेली : शहरात एचपी व भारत या दाेन्ही गॅस एजन्सी आहेत. एजन्सीच्या वतीने घरपोच गॅस सिलिंडर पाेहाेचण्याची सुविधा देण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील ही सुविधा कुचकामी ठरली आहे.
पंतप्रधान उज्ज्वला गॅस याेजनेचा अनेक ग्राहक आहेत. गडचिराेली तालुक्यातील पाेर्ला परिसरातील माेहझरी हे गाव आरमाेरीच्या गॅस एजन्सींकडे जाेडण्यात आले आहे. मात्र या एजन्सीमार्फत माेहझरी गावात जाऊन घरपोच सिलिंडर पाेहाेचविले जात नाही. गडचिराेली येथील एजन्सी सिलिंडरची गाडी माेहझरी गावात जाते. मात्र आरमाेरीच्या एजन्सी सिलिंडरची गाडी पाेर्लापर्यंत पाेहाेचते. त्या ठिकाणी माेहझरी तसेच आजूबाजूच्या गावातील सिलिंडर उतरवून परस्पर निघून जाते. परिणामी माेहझरी तसेच आजूबाजूच्या गावातील उज्ज्वला याेजनेच्या लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी महिला लाभार्थ्यांनी केली आहे. सिलिंडर व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास आंदाेलन छेडण्याचा इशारा माेहझरीवासीयांनी दिला आहे.