कॉमन सर्व्हिस सेंटरमधून मिळणार गॅस सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:19+5:302021-07-27T04:38:19+5:30
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर उभारण्यात आले असून या माध्यमातून गावातच गॅस सिलिंडर ...
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर उभारण्यात आले असून या माध्यमातून गावातच गॅस सिलिंडर मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याचा शुभारंभ शनिवार २४ जुलै राेजी करण्यात आला.
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण जनतेला गावातल्या गावात गॅस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही सुविधा निर्माण करण्यात आली. त्याची जबाबदारी नंदकिशोर तुपटे यांनी घेतली आहे. या उपक्रमात नवीन गॅस कनेक्शन, गॅस सिलिंडर भरणा, गॅस बुकिंग अशा प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत. शुभारंभप्रसंगी कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, उपसरपंच अनिल मस्के, ग्रामविकास अधिकारी नारायण राऊत, ग्रामपंचायत सदस्य मनीषा लाडे, पाेलीस पाटील श्यामराव उईके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चुडीराम राजगिरे, सीएससी जिल्हा समन्वयक शाहीद शेख, लोमेशकुमार चौधरी, अंकुश शहारे, गोवर्धन दंडारे, अशोक राऊत, आसाराम धकाते, विवेक केळझरकर, देवा राऊत, लोमेश चौधरी, शरद सोनवाने, गोपाल बुल्ले व गावातील नागरिक उपस्थित होते.