वनविभागातर्फे ६४ लाभार्थ्यांना गॅस वाटप
By admin | Published: March 25, 2017 02:23 AM2017-03-25T02:23:49+5:302017-03-25T02:23:49+5:30
जागतिक वनदिनाचे औचित्य साधून देचलीपेठा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पेठा, देचली व येलाराम या गावांमधील
पेठा, देचली, येलाराम येथील ग्रामस्थांना लाभ
देचलीपेठा : जागतिक वनदिनाचे औचित्य साधून देचलीपेठा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पेठा, देचली व येलाराम या गावांमधील एकूण ६४ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन संरक्षण समिती पेठाचे अध्यक्ष सत्यम वेलादी तर प्रमुख अतिथी म्हणून कोंजेडच्या वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष नीलेश मडावी उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी अमिती एल. भिसे, क्षेत्र सहायक एस. एल. इप्पाला, वनरक्षक नारनवरे आदी उपस्थित होते. दुर्गम व अतिसंवेदनशील भाग असलेल्या देचलीपेठा व येलाराम येथील नागरिक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणून जळाऊ लाकडाचा वापर करतात, जंगलावरील भार कमी व्हावा, यासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. (वार्ताहर)