गॅस दरवाढीने पुन्हा सरपणाचे ‘डोक्यावर ओझे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:25+5:302021-09-16T04:45:25+5:30

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत उज्ज्वला याेजनेतून तसेच वन विभागाकडून महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले हाेते. अनेक ...

Gas price hike again 'burdens on the head' | गॅस दरवाढीने पुन्हा सरपणाचे ‘डोक्यावर ओझे’

गॅस दरवाढीने पुन्हा सरपणाचे ‘डोक्यावर ओझे’

Next

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत उज्ज्वला याेजनेतून तसेच वन विभागाकडून महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले हाेते. अनेक महिलांनी सुरुवातीला काही दिवस गॅसचा वापर केला; परंतु गॅसची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना ते वापरणे शक्य झाले नाही. गॅस भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असल्याने महिला व नागरिक पुन्हा जंगलात सरपण आणण्याकरिता जात आहेत. गॅसऐवजी पुन्हा घराेघरी मातीच्या चुली पेटत आहेत.

वनाचे संरक्षण व्हावे. धूरमुक्त गाव तयार हाेऊन पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात सरपणाचा वापर करणाऱ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला किमती वाजवी हाेत्या; परंतु अचानक दरवाढ केली. सध्या एक हजार रुपयांच्या वर किंमत गॅस सिलिंडरसाठी माेजावी लागत आहे. ही दरवाढ नागरिकांना परवडत नसल्याने घरोघरी पुन्हा मातीच्या चुली पेटविल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर कुटुंबांचे आर्थिक बजेट कमीच असते. त्यांना दर महिन्यात वीज बिल, गॅस सिलिंडर व अन्य साेयींसाठी नियमित पैशांची व्यवस्था करावी लागते.

बाॅक्स

मजुरांचे हाल

अनेकजण शेती व्यवसायासह लहानसहान कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही लाेक तर भूमिहीन असतात. त्यांना मजुरीच्या भरवशावरच उदरनिर्वाह करावा लागताे. अशास्थितीत महिन्याचे आर्थिक बजेट कसे सांभाळावे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर असताे. त्यामुळे अनेकजण गॅसचा वापर टाळून जंगलातून सरपण आणतात. महिला डाेक्यावर माेळी आणतात, तर पुरुष सायकलवर सरपणाची माेळी आणतात. महागाईमुळे मजुरांचे सर्वाधिक हाल हाेत आहे.

Web Title: Gas price hike again 'burdens on the head'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.