गॅस संपला आता राॅकेलही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:34 AM2021-03-08T04:34:41+5:302021-03-08T04:34:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क महागाव बुज : उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. आता गॅस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
महागाव बुज : उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. आता गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने विस्तव पेटविण्यासाठी महिलांच्या डाेळ्यांतून अश्रू बाहेर पडत आहेत.
ग्रामीण भागातील ९० टक्के कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत हाेते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार हाेतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅसच्या किमती भरमसाट वाढत आहेत. गॅसवर दिली जाणारी सबसिडीही शासनाने कमी केली आहे. ९०० रुपयांचा सिलिंडर खरेदी करणे गरीब कुटुंबाला शक्य नसल्याने पुन्हा गॅसवरच स्वयंपाक करण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत अडगळीत पडलेल्या चुलींचा पुन्हा वापर सुरू झाला आहे. गॅस पेटविण्यासाठी राॅकेलचा वापर केला जाते. तसेच दुर्गम भागातील वीजपुरवठाही वेळाेवेळी खंडित हाेत असल्याने दिवा लावण्यासाठी राॅकेलचा वापर केला जाते. प्रत्येक कुटुंबाला राॅकेल आवश्यक आहे. मात्र, ते मिळत नसल्याने नागरिकांना अवैध मार्गाने राॅकेल खरेदी करावे लागत आहे. त्यासाठी ५० ते ६० रुपये लीटर किंमत माेजावी लागत आहे.