नाडवाही नदीवरील बंधाऱ्यांचे दरवाजे गेले चाेरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:23+5:302021-05-30T04:28:23+5:30
जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या अंतर्गत अनेक छोटे बंधारे बांधण्याचे काम झाले, पण हे बंधारे कुचकामी ठरले आहेत. आरमोरी तालुक्यातील ...
जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या अंतर्गत अनेक छोटे बंधारे बांधण्याचे काम झाले, पण हे बंधारे कुचकामी ठरले आहेत. आरमोरी तालुक्यातील वडेगाव मेंढा कुकडीदरम्यान वाहणाऱ्या नाडवाही नदीवर जिल्हा परिषदेंतर्गत दाेन बंधाऱ्याचे बांधकाम झाले, पण दोन्ही बंधारे सद्यस्थितीत कुचकामी ठरले आहेत. कोणतेही नियोजन नसताना, या नाडवाही नदीवर अगदी जवळजवळ दोन बंधारे बांधण्यात आले. त्यापैकी एका बंधाऱ्याचे काम जिल्हा परिषदे सदस्यांने केले, तर दुसरा बंधारा हा जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने बांधण्यात आला. उन्हाळ्यात या बंधाऱ्याचा एक थेंबही पाणी शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसाठी उपयोगी पडत नाही.
बंधाऱ्याचे पाणी साठवणुकीसाठी लावलेले दरवाजे लोकांनी चोरून नेले. सद्यस्थितीत या बंधाऱ्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही, तरी संबंधित विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून सिंचन सोय होईल, अशी व्यवस्था करावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
===Photopath===
290521\img_20210522_094456.jpg
===Caption===
नाडवाही वरील बधार्याचे दरवाजे चोरीला