गोवारी बांधव एक झाल्यास प्रश्न सुटेल

By admin | Published: October 29, 2015 02:07 AM2015-10-29T02:07:18+5:302015-10-29T02:07:18+5:30

गोवारी समाज विविध संघटनात विभागला गेला आहे. समाजाने एकत्र लढा दिल्याशिवाय समाजाचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत.

Gawai brothers will leave the question if they get one | गोवारी बांधव एक झाल्यास प्रश्न सुटेल

गोवारी बांधव एक झाल्यास प्रश्न सुटेल

Next

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : आदिवासी गोवारी जमात संयुक्त अधिवेशन
देसाईगंज : गोवारी समाज विविध संघटनात विभागला गेला आहे. समाजाने एकत्र लढा दिल्याशिवाय समाजाचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत. गोवारी समाज अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे. गोवारी समाजाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रसायन व उर्वरक खात्याचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. आदिवारी गोवारी जमात यांच्या सयुक्त अधिवेशनात रविवारी ते बोलत होते.
यावेळी खासदार अशोक नेते, आ. नाना शामकुळे, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश अर्जुनवार, उपस्थित होते. आ. क्रिष्णा गजबे यांनी गोवारी समाजाची अत्यंत दयनिय अवस्था असल्याचे सांगून आरक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगत होऊ शकतो, असे प्रतिपादन केले.
या अधिवेशनाला दे. गो. चचाने, नारायण सहारे, झेड. आर. दुधकुंवर, वासुदेव नेवारे, चौधरी, प्रभू काळसर्पे, मधुसूदन मुरखे, देवराव पदिले, वासुदेव ठाकरे, प्रकाश राऊत, डॉ. आनंद नेवारे, दामोधर नेवारे, भास्कर नेवारे, मारोती मुरखे, भाष्कर राऊत, डी. जी. बास्कवरे, अरूण मंडलवार, रितेश सहारे, जनाजी लोहट, मारोतराव वाघाडे, बळीराम चचाने, अरूणा चचाने, मनीषा भोडे आदी उपस्थित होते. अधिवेशनाचे संयोजन शालीक नेवारे, डेडू राऊत, नाना ठाकूर, गजानन कोहळे, राज ठाकरे, उत्तम राऊत, शांताराम राऊत, यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.एम.एस. राऊत यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Gawai brothers will leave the question if they get one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.