६५० विद्यार्थ्यांनी दिली सामान्य ज्ञान परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:48+5:302021-02-16T04:36:48+5:30

आष्टी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा युवा मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. ही परीक्षा ६५० ...

General knowledge test given by 650 students | ६५० विद्यार्थ्यांनी दिली सामान्य ज्ञान परीक्षा

६५० विद्यार्थ्यांनी दिली सामान्य ज्ञान परीक्षा

Next

आष्टी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा युवा मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. ही परीक्षा ६५० विद्यार्थ्यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन ग्रा.पं. सदस्य राकेश बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य कपिल पाल, संतोष बारापात्रे, प्रा. रवींद्र इंगोले, शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष पावन रामगीरकार, सचिव सुमित कुकुडकर, उपाध्यक्ष संदीप तिवाडे, कोषाध्यक्ष पिनू चतुर, पत्रकार सुधीर फरकाडे, गणेश शिंगाडे, मंगेश पोरटे उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या पटांगणात सकाळी ९ ते १०.३० वाजता या वेळेत ही सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. इयत्ता ५ वी ते ८ वी ‘अ’ गट, आणि इयत्ता ९ ते १२ वी ‘ब’ गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. आष्टीच्या सर्व शाळातील ६५० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजयी स्पर्धकाला १९ फेब्रुवारी राेजी बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे आकाश लोडेल्लीवार, सूरज सोयम, अश्विन लांजेवार, गणेश चौधरी, अंकित उरकुडे, विशाल मंडल, परेश मोहुर्ले, शिवाजी लोणारे, सागर वाकुडकर, राहुल आलचेट्टीवार, अक्षय हनमलवार, चेतन काळे, पावन ठुसे, हर्षल नेवारे, मयूर कोरवते, सूरज कानकाटे, सूरज गोहणे, प्रलय धारणे, चेतन बेलकीवार, अतुल कुकुडकर, अनिकेत बोडे, गोलू पोटवार, चेतन कारेकर यांनी सहकार्य केले.

Web Title: General knowledge test given by 650 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.