कृषी व आरोग्यावर आमसभा गाजली

By admin | Published: May 31, 2017 02:25 AM2017-05-31T02:25:43+5:302017-05-31T02:25:43+5:30

कुरखेडा पंचायत समितीची वार्षिक आमसभा ३० मे रोजी मंगळवारला येथील किसान सभागृहात

General public meeting on agriculture and health | कृषी व आरोग्यावर आमसभा गाजली

कृषी व आरोग्यावर आमसभा गाजली

Next

आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर : पंचायत समितीचा नियोजनशून्य कारभार आला उजेडात
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पंचायत समितीची वार्षिक आमसभा ३० मे रोजी मंगळवारला येथील किसान सभागृहात आ. कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मुद्रा कर्ज वितरणाच्या प्रकरणावर आ. गजबे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या सभेत कृषी व आरोग्य हे दोन मुद्दे चांगलेच गाजले. दरम्यान या सभेत या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभार उजेडात आला.
यावेळी सभेला जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, नाजूक पुराम, गीता कुमरे, कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी पी. एल. मरस्कोल्हे, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, संध्या नैताम, श्रीराम दुगा, सुनंदा हलामी, कविता गुरनुले, शारदा पोरेटी, माधुरी मडावी, वर्षा कोकोडे, न. पं. सभापतपी आशा तुलावी, न. पं. सदस्य अ‍ॅड. उमेश वालदे, बबलू हुसैनी, रामहरी उगले, राम लांजेवार, विलास गावंडे, माजी जि. प. सदस्य अशोक इंदुरकर, नंदू नरोटे, गणपत सोनकुसरे, गीता धाबेकर, तुळशिराम बोगा, किशोर तलमले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्टेट बँक आॅफ इंडियाचे कुरखेडा येथील शाखा व्यवस्थापक मुद्रा कर्ज योजनेच्या प्रस्तावाबाबत गांभीर्य दाखवत नाही. तसेच लाभार्थ्यांशी व्यवस्थिरित्या वर्तवणूक करीत नाही, अशी तक्रार करण्यात आली. यावर आ. गजबे, कृषी सभापती नाकाडे यांनी या व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले. तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या नियोजन शून्य कारभाराबाबत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या दोन्ही विभागाच्या कामात सुधारणा झाली पाहिजे, असे निर्देश आ. गजबे यांनी यावेळी दिले. तालुका आरोग्य विभागामार्फत मानव विकास मिशनच्या निधीतून गरोदर माता तपासणी आरोग्य मेळावे आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मेळावे घेण्यात आले नाही. त्यामुळे निधी परत गेला. देऊळगाव व कढोली येथे आरोग्य मेळावे घेण्यात आले. मात्र या मेळाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले नाही. त्यामुळे विभाग प्रमुखावर ताशेरे ओढून सदर योजनेअंतर्गत खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याचा ठराव सभेत पारीत करण्यात आला.
प्रास्ताविक बीडीओ मरस्कोल्हे, अनुपाल वाचन विस्तार अधिकारी वाघाडे, संचालन शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी केले तर आभार राजेश फाये यांनी मानले.

रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्था ढासळल्याच्या मुद्यावर चर्चा
जि. प. सदस्य तुलावी व कराडे यांनी कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाही, अशी तक्रार केली. यावर रिक्तपदे भरण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असे आश्वासन आ. कृष्णा गजबे यांनी सभेत दिले. माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे यांनी कुरखेडा तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयात बहुतांश विभाग प्रमुख हे प्रभारी आहेत. त्यामुळे विकासाची गती मंदावली आहे, असा आरोप करीत कुरखेडा तालुक्यात नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

 

Web Title: General public meeting on agriculture and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.