हरितसेना बसमार्फत वृक्ष लागवडीची जनजागृती

By Admin | Published: May 6, 2017 01:26 AM2017-05-06T01:26:38+5:302017-05-06T01:26:38+5:30

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने तयार केलेली हरितसेना बस गुरूवारी गडचिरोली येथील

Generation of tree plantation through Haritasena bus | हरितसेना बसमार्फत वृक्ष लागवडीची जनजागृती

हरितसेना बसमार्फत वृक्ष लागवडीची जनजागृती

googlenewsNext

हरितसेना स्वयंसेवकांची नोंदणी : आरमोरी, देसाईगंजात नागरिकांनी स्वागत करून केले रवाना

शहर/तालुका प्रतिनिधी ।

लोकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी/ देसाईगंज : वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने तयार केलेली हरितसेना बस गुरूवारी गडचिरोली येथील उपवन संरक्षक कार्यालयातून आरमोरी व देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर बसच्या माध्यमातून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात आली. दरम्यान अनेकांनी हरितसेना स्वयंसेवक म्हणून नोंदणीही केली.

आरमोरी येथे हरितसेना बस पोहोचल्यानंतर या बसला जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी पं. स. सदस्य विवेक खेवले, भाजप युवा मोर्चाचे शहर प्रमुख पंकज खरवडे, तेजराव बोरकर, वन परिक्षेत्र अधिकारी तांबटकर, मनोहर सुंदरकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, ता. प्र. स. अध्यक्ष दौलत धोटे, विलास चिलबुले, गोलू वाघरे, सचिन बेहरे, सचिन जवादे व पत्रकार उपस्थित होते.

हरितसेना बस देसाईगंज येथे पोहोचली. देसाईगंज येथील वन परिक्षेत्र कार्यालयात हरितसेना बसचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी आ. क्रिष्णा गजबे यांनी बसला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर गजबे यांनी स्वत: हरितसेना स्वयंसेवक सदस्य नोंदणी करून प्रशस्तीपत्र प्राप्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, उपविभागीय वनाधिकारी कांबळे, तहसीलदार सोनवाने, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांदरे, नायब तहसीलदार उमेश अंबादे, विस्तार अधिकारी थोटे, उके उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, माडावार, बारसागडे, देवगडे, कोसमशिले, सोंधिया, वनपाल चौधरी तसेच वनरक्षक व वनमजूर हजर होते.

Web Title: Generation of tree plantation through Haritasena bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.