शुद्ध व थंड पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:59 AM2018-03-11T00:59:52+5:302018-03-11T00:59:52+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महिला सबलीकरण कार्यक्रमांतून श्रम साफल्य साधन केंद्र चामोर्शी अंतर्गत मार्र्कंडादेव येथे शुद्ध व थंड पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

Get clean and cold water | शुद्ध व थंड पाणी मिळणार

शुद्ध व थंड पाणी मिळणार

Next
ठळक मुद्देमाविमचा पुढाकार : मार्र्कंडादेव येथे वॉटर एटीएम कार्यान्वित

ऑनलाईन लोकमत
मार्र्कंडादेव : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महिला सबलीकरण कार्यक्रमांतून श्रम साफल्य साधन केंद्र चामोर्शी अंतर्गत मार्र्कंडादेव येथे शुद्ध व थंड पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून येथे वॉटर एटीएम सुरू करण्यात आले आहे. या वॉटर एटीएममधून पाच रूपये किमतीत नागरिकांना एक लिटर शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.
सदर वॉटर एटीएम संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्र्कंडादेवच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय आवारात बसविण्यात आले आहे. जवळपास एक लाख रूपये किमतीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सदर वॉटर एटीएम ही २०० लिटर क्षमतेची आहे. सदर एटीएमवर पाणी टाकी बसविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठयात सातत्य राहिल. सदर वॉटर एटीएमचा शुभारंभ सरपंच उज्वला गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्यूंजय गायकवाड, ग्रा.पं. सदस्य सुनिता म्हरस्कोल्हे आदी उपस्थित होते.
तासाला ५० लिटर पाणी उपलब्ध होणार
मार्र्कंडादेव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रकल्पातून एका तासाला ५० लिटर शुध्द व थंड पाणी उपलब्ध होणार आहे. दिवसभरात एक ते दीड हजार लोकांना पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पातून बचत गट व ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. महिलांना रोजगारही मिळणार आहे. जत्राकाळात या उद्योगास भरभराटी मिळेल, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कांता मिश्रा यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Get clean and cold water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.