धान पिकाच्या किडीवर नियंत्रण मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:08 PM2018-08-06T23:08:41+5:302018-08-06T23:09:01+5:30
पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला बºयापैकी सुरवात झाली असून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये रोवणीची कामे आटोपलेली आहेत. सध्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारली असून ढगाळ वातावरण कायम आहे. नियमित ढगाळ वातावरण, रिमझीम पाऊस, वातावरणातील भक्कम आर्द्रता व दिवसातील ३-४ तास सूर्यप्रकाश हा लष्करी अळीचा उद्रेक होण्यास पोषक वातावरण ठरू शकतो व त्यामुळेच लष्करी अळीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गादमाशी : गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. उशीरा रोवणी केलेले धान, ढगाळलेले वातावरण, रिमझीम पडणारा पाऊस, ८० ते ९० टक्के वातावरणातील आर्द्रता या किडीच्या वाढीस अतिशय पोषक ठरते. प्रादुर्भावग्रस्त फुटवे आढळून आल्यास फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के दाणेदार १५ किलो प्रती हेक्टरी या प्रमाणाात बांधीमध्ये ५ ते १० सेंमी पाणी असताना नियंत्रणाकरीता वापरावे.
पाने गुंडाळणारी अळी : या किडीचे पतंग सोनेरी फिक्कट सोनेरी पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या पंखावर काळी नागमोळी नक्षी असते. पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते, डोके मात्र काळसर असते. अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. किडग्रस्त पाने दिसल्यास मॅलाथीआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा टॉयझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सुरळीतील अळी /बेरडी : पतंग लहान व नाजूक असून त्याचे पांढºया पंखावर तांबूस लालसर ठिपके असतात. अळी पानाच्या सुरळीत किंवा पुंगळीत असते. पाने कैचीने कापल्यासारखे दिसल्यास किटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
असा करा लष्करी अळीचा नायनाट
लष्कर अळ्या पाने कुरतडतात. या अळीच्या नियंत्रणाकरीता क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ४ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ही अळी नष्ट होते.