राष्ट्रीय महामार्गाचे काम २० दिवसांत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:38 AM2021-05-18T04:38:19+5:302021-05-18T04:38:19+5:30
गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी ते तळोधी पर्यंतच्या रस्त्याचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झालेले आहे. तळोधी ते चामोर्शी ...
गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी ते तळोधी पर्यंतच्या रस्त्याचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झालेले आहे. तळोधी ते चामोर्शी शहरापर्यंतचा रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास रस्त्यावर दाेन ते तीन फूट पाणी साचेल व रहदारीस अडचण निर्माण होईल. या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आज दि. १७ मे रोजी खासदार अशोक नेते हे चामोर्शीच्या दौऱ्यावर असताना शहरातील नागरिकांनी चामोर्शी शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल ही बाब खासदारांच्या निर्दशनास आणून दिली. यावेळी खासदार अशोक नेते राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांना दूरध्वनी करून चामोर्शी शहरातील रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांना रस्ता सुरळीत करून देण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात पाणी साचून चारचाकी वाहने व पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचण होणार असल्याने हे काम जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देशही खासदार अशोक नेते यांनी दिले.
===Photopath===
170521\img-20210517-wa0067.jpg
===Caption===
चामोर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 20 दिवसात पूर्ण करा- खासदार अशोक नेते यांचे निर्देश