काेणतीही शंका न बाळगता लस घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:14+5:302021-04-30T04:46:14+5:30
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काहीजणांना किंचित ताप येणे, अंगदुखी, लस टाेचलेल्या जागेवर थाेड्याफार प्रमाणात दुखणे अशी किरकाेळ ...
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काहीजणांना किंचित ताप येणे, अंगदुखी, लस टाेचलेल्या जागेवर थाेड्याफार प्रमाणात दुखणे अशी किरकाेळ लक्षणे आढळून येतात. हा त्रास जास्तीत जास्त दाेन दिवस राहताे. मात्र, काेणतेही दुष्परिणाम नाही. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून काेविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याची लाेकसंख्या जवळपास ११ लाख आहे. त्याकरिता अंदाजे चार लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी ६३ हजार लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. नागरिकांनी लस घ्यावी, याबाबत आराेग्य विभागामार्फत जागृती केली जात आहे. मात्र, नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. साेशल मीडियाद्वारे या लसबाबत चुकीच्या अफवा व शंकाकुशंका पसरविल्या जात आहेत. याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. जिल्ह्यात एकूण ७१ आराेग्य संस्थांमध्ये लसीकरण सुरू आहे. आठवड्यातील साेमवार ते शनिवार या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत लसीकरण केले जात आहे. जवळचे प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाताना आधारकार्ड घेऊन जावे किंवा आराेग्य सेतू ॲपवर जाऊन लसीकरणासाठी आपला दिनांक व वेळ आरक्षित करून घ्यावा, जेणेकरून गैरसाेय हाेणार नाही.
ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवक, पाेलीस पाटील, शिक्षक, लाेकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांमध्ये जागृती करून लसचे महत्त्व पटवून द्यावे व लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. काेराेनाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आराेग्य अधिकारी यांनी केले आहे.
बाॅक्स...
तालुकास्तरावर काेविड नियंत्रण कक्ष
काेराेनाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर काेविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना या कक्षावरून अधिकची माहिती उपलब्ध हाेणार आहे. धानाेरा तालुक्यासाठी ९३५९४०८१२३, आरमाेरी ९४०५२०२०७९, देसाईगंज ०७१३७-२७२४००, कुरखेडा ०७१३९-२४५१९९, चामाेर्शी ८२७५९१३१०७, काेरची ८२७५९३२५९९, मुलचेरा ०७१३५-२७१०३३, ८२७५८७९९८१, अहेरी ०७१३३-२९५००१, एटापल्ली ०७१३६-२९५२१०, भामरागड ०७१३४-२२००३९, सिराेंचा ०७१२१-२३३१२९ या क्रमांकावर संपर्क साधून अधिकची माहिती जाणून घ्यावी.
बाॅक्स...
लसीकरणामुळे काेराेनाची तीव्रता हाेते कमी
बऱ्याच नागरिकांनी लसीकरणाचे दाेन्ही डाेस पूर्ण केल्यानंतरही काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, लसीकरणाचे दाेन्ही डाेस पूर्ण झाल्यामुळे काेराेना आजारामुळे येत असलेल्या लक्षणांची तीव्रता फार कमी प्रमाणात आहे. तसेच या आजारातून हाेण्याचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आराेग्य अधिकारी यांनी केले आहे.