अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:28 AM2021-06-04T04:28:08+5:302021-06-04T04:28:08+5:30
काेरची तहसील कार्यालयाच्या सभागृहात २ जून राेजी काेविड लसीकरण व जनजागृती सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. ...
काेरची तहसील कार्यालयाच्या सभागृहात २ जून राेजी काेविड लसीकरण व जनजागृती सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. सभेला जिल्हा माता बाल संगोपन तथा लसीकरण अधिकारी डॉ. समीर बनसोडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. सतीश गोगुलवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, आदिवासी विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष मुकेश नरोटे, अशोक गावतुरे, तहसीलदार सी.आर. भंडारी, गटविकास अधिकारी डी.एम. देवरे, विस्तार अधिकारी राजेश फाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. हरीश टेकाम, गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बी.व्ही. हाके, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रा.पं. सदस्य, महिला बचतगटाच्या पदाधिकारी, ग्रामसभा व महाग्रामसभेचे पदाधिकारी, तलाठी, पत्रकार, ग्रामसेवक, गावातील पुजारी उपस्थित होते. कोरची तालुक्यात आतापर्यंत २ हजार ८०० नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. यामधील कुणालाही कोरोना झाला नाही. कोरोना लस घेण्याची टक्केवारी कमी आहे. ती वेगाने वाढवून कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी १०० टक्के लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सीईओ आशीर्वाद यांनी जनतेला केले. ही बैठक दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत तब्बल चार तास सुरू होती.
बाॅक्स
मृत्यू हाेत नसल्याचे हमीपत्र लिहून देऊ
कोरोना लसीकरणाकडे होणाऱ्या अफवावरून गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीतील उपस्थितांच्या काय अडचणी आहेत व कोणत्या शंका कुशंका आहेत ते जाहीरपणे समोर मांडावे, त्या आम्ही दूर करू, असे आशीर्वाद यांनी सांगितले. यामध्ये उपस्थित ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या गावातील लोक लस न घेण्याची समस्या सांगितले. त्यात कोरोना लस घेतली की मृत्यू होतो, नपुंसकता होतो, किडनी काढून टाकतात अशा प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये पसरल्याने लोक लस घेण्यासाठी तयार होत नसल्याचे सांगीतले. आशीर्वाद यांनी समजूत काढत म्हणाले की लस घेतल्याने माणूस मरत नाही, असे असेल तर गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मी स्वतः हमीपत्र लिहून देण्यास तयार असल्याचे सभेत सांगितले.