घरकुल लाभार्थी राेहयाे निधीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:43 AM2021-09-15T04:43:00+5:302021-09-15T04:43:00+5:30

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे; परंतु राेजगार हमी याेजनेद्वारे दिली जाणारी २० हजार रुपयांची ...

Gharkul beneficiaries await release of funds | घरकुल लाभार्थी राेहयाे निधीच्या प्रतीक्षेत

घरकुल लाभार्थी राेहयाे निधीच्या प्रतीक्षेत

Next

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे; परंतु राेजगार हमी याेजनेद्वारे दिली जाणारी २० हजार रुपयांची रक्कम पंचायत समितीकडून अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राेजंदारांची मजुरी कशी द्यायची, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची लगबग लाभार्थी करीत आहेत. अनेकजणांना निवासाचा प्रश्न असल्याने स्लॅब टाकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींचा एक मस्टर जमा करण्यात आला; पण काहींचे अजून एकही मस्टर काढले नसल्याने मजुरांना मजुरी कुठून देणार? असा प्रश्न लाभार्थ्यांसमाेर आहे. काहींचे बांधकाम पूर्ण झाले, तर काहींचे शिल्लक आहे. त्यामुळे रोहयोंतर्गत मिळणारी रक्कम लवकर जमा करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Gharkul beneficiaries await release of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.