गडचिरोलीत यंदाही मुलीच हुश्शार !

By संजय तिपाले | Published: May 27, 2024 02:36 PM2024-05-27T14:36:19+5:302024-05-27T14:36:59+5:30

दहावीचा ९४.६७ टक्के निकाल: विभागात चौथ्या स्थानी घसरण, ६१५९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत

Girls give more result in Gadchiroli this year too! | गडचिरोलीत यंदाही मुलीच हुश्शार !

Girls give more result in Gadchiroli this year too!

गडचिरोली : बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल २७ मे रोजी संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६७ टक्के इतका लागला असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत टक्का वाढूनही नागपूर विभागात मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १४३०५ विद्यार्थी (मुले ७ हजार ३९७ व मुली ६ हजार ९०८) प्रविष्ठ होते. यापैकी प्रत्यक्षात ७ हजार २०४८ मुले व ६ हजार ७७७ मुली अशा एकूण १४ हजार २५ जणांनी परीक्षा दिली होती. यातील १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ७३३ मुले व ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९२.८९ तर मुलींचा ९६.५७ इतका आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ९२.५२ टक्के इतका होता. टक्का कमी असतानाही गडचिरोली जिल्ह्याने विभागात तृतीय स्थान पटकावले होते. यंदा जिल्ह्याने सरासरी ९४.६७ टक्के गुण मिळवूनही विभागात चौथ्या स्थानी घसरण झाली.

 वर्षनिहाय निकाल
२०२२ ९५.६२
२०२३ ९२.५२
२०२४ ९४.६७

किती पास, किती नापास ?
यंदा१४०२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १३२७८ जण उत्तीर्ण झाले तर ७४७ जण अनुत्तीर्ण झाले. त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल.

नागपूर विभागात कामगिरी अशी...
जिल्हा प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी एकूण उत्तीर्ण टक्केवारी
गोंदिया ६९७६ ३४७४ १७४५५ ९६.११
भंडारा ६१२९ ३९९१ १५२३८ ९५.४१
नागपूर १९८५३ १५३२२ ५५७९८ ९५.१७
गडचिरोली ६१५९ ३५२२ १३२२८ ९४.६७
गोंदिया ७९७६ ३४७४ १७४५५ ९६.११
वर्धा ५१५० ४५५० १४४६० ९२.०२

२५६ पैकी १८१ रिपीटर उत्तीर्ण
दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या २६० जणांनी पुन्हा परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी २५६ जणांनी परीक्षा दिली. यातील १८१ जण उत्तीर्ण झाले. याचा एकूण टक्का ७०.७० इतका आहे. नागपूर विभागात रिपीटरच्या उत्तीर्णतेत गडचिरोली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
 

Web Title: Girls give more result in Gadchiroli this year too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.