सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:28 PM2018-05-29T23:28:21+5:302018-05-29T23:28:32+5:30
सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीचा निकाल मंगळवारी घोषीत करण्यात आला. यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी अवंती अनंत मेश्राम हिने ९८.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर गडचिरोली येथीलच स्कूल आॅफ स्कालर्सची विद्यार्थिनी वैदेही हुमेंद्र पारधी हिने ९७.६० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून द्वितीय आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीचा निकाल मंगळवारी घोषीत करण्यात आला. यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी अवंती अनंत मेश्राम हिने ९८.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर गडचिरोली येथीलच स्कूल आॅफ स्कालर्सची विद्यार्थिनी वैदेही हुमेंद्र पारधी हिने ९७.६० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून द्वितीय आली आहे.
स्कूल आॅफ स्कॉलर्स येथील एकूण १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १५ मुलांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका उषा रामलिंगम, उपमुख्याध्यापक निखील तुकदेव, तपोती गयाली, शैलेश आकरे, अमोल तुकदेव यांनी कौतुक केले.
कारमेल हायस्कूल गडचिरोली येथील १२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ६० विद्यार्थ्यांना ४५ टक्केपेक्षा अधिक गुण आहेत. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर जिगनेश, उपमुख्याध्यापक बिन्सी यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक सुध्दा उपस्थित होते.
जवाहरलाल नवोदय विद्यालय घोट येथील ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दीक्षा सहारे हिला ९२.८० टक्के गुण मिळाले असून ती विद्यालयातून प्रथम आली आहे.
कारमेल हायस्कूल देसाईगंज येथील तीन विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.