रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:49 PM2017-12-26T23:49:05+5:302017-12-26T23:49:20+5:30
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर बांधले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जाणार आहे. काही शेतकरी कायमचे भूमीहिन होणार आहेत. रेल्वेचा फायदा शहरांना होणार असला तरी शेतकरी मात्र नेस्तनाभूत होणार आहेत. शेतकऱ्यांना नगण्य किंमत देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. रेल्वेमध्ये जमीन गेल्यानंतर दुसरीकडे बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी करता यावी, यासाठी त्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. खुल्या बाजाराच्या चारपट रक्कम द्यावी, शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला रेल्वे बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, भूमीहिन होणाºया शेतकºयांना त्याच परिसरात शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज शहरातील भूखंडधारकांना बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी आशिष ब्राह्मणवाडे, भूपेश फुलझेले, वसंत राऊत, भगवान घोटेकर, प्रा. सचिन फुलझेले, प्रशांत ठाकरे, सुनील बाबनवाडे, प्रा. पंकज नरूले, स्वप्नील मलोडे, सचिन गोंगल, आशिष म्हशाखेत्री, रा.ना. गोहणे, विलास भोयर, अभय मुलताने, व्ही.आर. चुधरी, रत्नदीप म्हशाखेत्री, रूपेश ठाकरे, संदीप ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, नगरसेवक सतीश विधाते, विलास खेवले, महाजन आदी उपस्थित होते.