तेंदूपत्ता रॉयल्टी रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:36 PM2017-09-25T23:36:43+5:302017-09-25T23:37:00+5:30
२०१५ च्या तेंदू हंगामातील अनुसूचित क्षेत्रातील तेंदू घटकनिहाय प्राप्त किमतीतून ९९ टक्के रॉयल्टी रक्कम गावनिहाय संकलन झालेल्या तेंदूपानाप्रमाणे ग्रामकोष समितीला देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : २०१५ च्या तेंदू हंगामातील अनुसूचित क्षेत्रातील तेंदू घटकनिहाय प्राप्त किमतीतून ९९ टक्के रॉयल्टी रक्कम गावनिहाय संकलन झालेल्या तेंदूपानाप्रमाणे ग्रामकोष समितीला देण्यात आली. परंतु बेडगाव वन परिक्षेत्राने चुकीची माहिती दिल्याने अन्य गावांना अतिरिक्त रॉयल्टी रक्कम देण्यात आली. संबंधित ग्रामकोष समितीने जि. प. सीईओंना सदर रक्कम परत केली. परंतु ती रक्कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे मंगळवार २६ सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोरची तालुका महाग्रामसभेने जिल्हाधिकाºयांना दिला आहे.
तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरची तालुक्यातील ग्रा. पं. दवंडी अंतर्गत कुकडेल, राजाटोला, ग्रा. पं. बेलगाव अंतर्गत बेलगाव व टेमली ग्रा. पं. अंतर्गत आंबेखारी या गावातील रक्कम दवंडी, तुमकोट, पांडरापाणी या गावांना देण्यात आली. संबंधित गावांनी जि. प. ला रक्कम परत केली असतानाही ती आपल्या गावांना मिळाली नाही. त्यामुळे मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाग्रामसभांनी दिला.