ग्रामसभांना जोडपत्र-३ ची प्रत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:23 AM2017-11-24T00:23:34+5:302017-11-24T00:23:47+5:30
तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, अशी मागणी कोरची तालुक्यातील महाग्रामसभेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ अंतर्गत ग्रामसभांना सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. या हक्कानुसार सामूहिक वनक्षेत्रात असलेल्या वनोपजांचे संकलन, व्यवस्थापन व विक्री करण्याचे संपूर्ण अधिकार ग्रामसभांकडे देण्यात आले आहे. त्यानुसार कोरची तालुक्यातील ग्रामसभा वनांचे व्यवस्थापन करून अधिकाधिक तेंदू व बांबूचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जंगलाचा सुक्ष्म आराखडा तयार करून तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी जोडपत्र-३ आवश्यक करण्यात आले आहे. सदर जोडपत्र ग्रामसभांकडे नसल्याने ग्रामसभांना अडचणीत आणले जात आहे. सध्या सुधारीत जोडपत्र शासनाकडेच असल्यामुळे तेंदू व्यवसाय करीत असताना पुरावा म्हणून ग्रामसभांना जोडपत्र मागू नये, किंवा शासनाने सदर जोडपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून केले आहे. सदर निवेदन कोरचीचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शितल नैताम, झाडूराम हलामी, इजामसाय काटेंगे, हिरालाल सयाम, प्रेम तुलावी, संजू साखरे, सियाराम हलामी, कल्पना नैताम, यशवंत सहारे, राजू होळी उपस्थित होते.