जिल्ह्याला नवी ओळख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:48 AM2017-09-29T00:48:13+5:302017-09-29T00:48:26+5:30

शांतता असेल तर समृद्धी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खूप मोठा वाव आहे.

 Give the district a new identity | जिल्ह्याला नवी ओळख देणार

जिल्ह्याला नवी ओळख देणार

Next
ठळक मुद्दे गृह राज्यमंत्र्यांची ग्वाही : वन उत्पादनांवर आधारित उद्योगातून रोजगार वाढीस प्राधान्य देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शांतता असेल तर समृद्धी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खूप मोठा वाव आहे. यासाठी नक्षलवाद्यांचा बिमोड करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण) तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी येथे केले.
गुरूवारी गडचिरोली दौºयावर आले असताना ना.केसरकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम, पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक तसेच पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी बिपिन इटनकर, कार्यकारी अभियंता कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व इतर प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी राहणाºया पोलिस कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे, तसेच या जिल्हयात धानशेती प्रामुख्याने होते. याच सोबत वनउत्पादनावर आधारित उद्योगातून या भागासाठी उपजिविकेचे साधन वाढविणे याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर बैठकीनंतर शिवसेना नेते असलेल्या ना.केसरकर यांची विश्रामगृहात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाºयांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त आंतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटन
गडचिरोलीतील पोलीस विश्रामगृहाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या अांतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटन ना.केसरकर यांच्या हस्ते झाले. या सभागृहाच्या माध्यमातून लगतच्या तेलंगना आणि छत्तीसगड राज्यातील चार जिल्हे तसेच नजीकच्या चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यातील अधिकाºयांना संपर्कव समन्वय राखणे शक्य होणार आहे. उत्तम व्यवस्था असणाºया या वातानुकूलित सभागृहातून लगतच्या सर्व नक्षलग्रस्त जिल्हयातील अधिकाºयांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, अपर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमांडंन्ट के. एस. खुराणा हेसुद्धा उपस्थित होते. या समन्वय सभागृहाचे आरेखण व अंतर्गत सजावटीचे काम श्वेता बालाजी यांनी केली आहे. या सभागृहात अधिकाºयांना वाय-फाय सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.
शहिदांच्या परिवारिक अडचणी ऐका
यावेळी ना.केसरकर यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर किमान दोन महिन्यात बैठक घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या. शहीद कुटुंबीयांप्रती शासन संवेदनशील असून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देऊ असे ते म्हणाले.

अधिकारी-कर्मचाºयांचा गौरव
गेल्या वर्षभरात ज्यांनी पोलीस कारवाईत यश मिळविले अशा पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपविभागीय पोलिस अधिकाºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी चर्चा केली.

Web Title:  Give the district a new identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.