ईटीयाडोह कार्यालयाची जमीन इतर कार्यालयांसाठी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:49+5:302021-09-08T04:43:49+5:30
मागील काळात भंडारा जिल्हा असताना ईटीयाडोह नामक धरण गाढवी नदीवर बांधण्यात आले. सध्या हे धरण गोंदिया जिल्ह्यात असून या ...
मागील काळात भंडारा जिल्हा असताना ईटीयाडोह नामक धरण गाढवी नदीवर बांधण्यात आले. सध्या हे धरण गोंदिया जिल्ह्यात असून या धरणाचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यापर्यंत पोहोचते. कालवे निर्मितीच्या काळात देसाईगंज हे मध्यवर्ती ठिकाण व कालवे निर्मितीच्या जबाबदाऱ्या यामुळे येथे कर्मचारी निवासस्थाने, अधिकारी निवासस्थाने, विश्रामगृह यांची निर्मिती करण्यात आली. हा परिसर अंदाजे ४ एकर जागेचा आहे. ७५ टक्के परिसर मोकळा आहे. फक्त पाव भाग जागेत उपविभागीय कार्यालयाच्या दोन इमारती व निवासस्थाने एवढेच काय ते आहे. कर्मचारी वसाहत संपूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. त्यातच अलीकडील काळात ईटीयाडोह पाटबंधारे विभागाने गावपातळीवर पाणी वाटप व्यवस्थापन समिती, कॅनल देखभाल समिती व पाणी वाटप संस्था स्थापून दिल्याने कर्मचारी वर्ग कमी झाला आहे. कार्यालये तीन व कर्मचारी चार अशी अवस्था आहे. आज शहरातील डाक विभाग, तालुका कृषी विभाग, कृषी गोदामे, तत्सम अनेक कार्यालये भाडेतत्त्वावर घेतलेल्या तोकड्या जागेत आहेत. याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतो. ईटीयाडोह विभागाच्या अखत्यारीत असलेली बिना वापराची जमीन शासनाने अधिग्रहित करून या जागेचा वापर शासनाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामासाठी करण्यात यावा, अशी रास्त मागणी तालुकावासीय नागरिकांनी केली आहे.
060921\0737img_20200318_085504.jpg
हाच तो ईटीयाडोह पाटबंधारे विभागाचा बकाल पडलेला परिसर व मुख्य द्वार.