गोसेखुर्दचे पाणी कुरखेडा तालुक्यात द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:39 AM2017-09-29T00:39:37+5:302017-09-29T00:40:08+5:30
कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या सोयी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. या तालुक्याला गोसेखुर्द तसेच इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्धा करून द्यावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या सोयी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. या तालुक्याला गोसेखुर्द तसेच इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्धा करून द्यावे, त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३२ व्या वार्षिकर् साधारण सभेचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आ. हरीराम वरखडे, बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारिवार उपस्थित होते.
पुढे बोलताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, भारतातील वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर २०३० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १५० कोटी होण्याची शक्यता राष्टÑ संघटनेच्या अहवालात व्यक्त केली आहे. शेतीच्या विभाजनामुळे अल्पभूधारक शेतकºयांची संख्या वाढत चालली आहे. याचा परिणाम शेतीच्या विकासावर होत आहे. भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता सुद्धा संयुक्त राष्टÑसंघटनेने व्यक्त केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील ९५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. या तालुक्यातील जमीन सुपीक आहे. मात्र या तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. निसर्गाच्या भरवशावर शेती पिकेलच याचा भरवसा नाही. विदर्भातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून गोसेखुर्दची ओळख आहे. या प्रकल्पाचा लाभ चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला होत आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातही आणने शक्य आहे. इटियाडोह व गोसेखुर्द धरणाचे पाणी कुरखेडा तालुक्यात आल्यास या तालुक्यात हरीतक्रांती होईल. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय जलसंसाधन मंत्री कुरखेडा येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी गोसेखुर्द व इटियाडोह धरणाचे पाणी देण्याची मागणी केली होती. आता हे खाते ना. नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन गोसेखुर्द व इटियाडोहाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे मार्गदर्शन केले.
वार्षिक साधारण सभेला बँकेचे संलग्न सभासद उपस्थित होते.