गोरगरिबांना धान्यच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:16 PM2018-10-22T23:16:48+5:302018-10-22T23:17:07+5:30
राशन कार्डधारकांना धान्य न देता त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने २१ आॅगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयाचा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने विरोध केला असून गडचिरोली तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राशन कार्डधारकांना धान्य न देता त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने २१ आॅगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयाचा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने विरोध केला असून गडचिरोली तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
थेट लाभ हस्तांतरणास राशन दुकानदारांनी विरोध केल्यानंतर शासनाने २९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय घेऊन त्यामध्ये शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या पसंतीनुसार रोख धान्य अथवा रोख रक्कम देण्याचे सूचित केले आहे. थेट लाभ हस्तांतरणामुळे देशभरातील हजारो राशन दुकानदार व त्यावर अवलंबून असलेल्या इतर नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. चंदीगड व पांडेचेरी या राज्यात मागील दोन वर्षांपासून रोख सबसिडी प्रती व्यक्ती ११२ रूपये व जास्तीत जास्त पाच व्यक्तीच्या शिधापत्रिकेला ५६० रूपये देण्यात येत आहेत. या दोन्ही राज्यातील राशन दुकाने बंद झाली आहेत. महाराष्टÑ शासनानेही रोख सबसिडीचा निर्णय घेतला आहे. याला राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोध आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था संपुष्टा येईल. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणेच बंद होईल. त्यामुळे शेतकºयांच्या मालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळेल, तसेच खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वादराने धान्याची विक्री करतील. यामुळे जनतेची लूट होणार आहे. त्यामुळे पूर्ववत धान्य उपलब्ध करून द्यावे, केरोसीनचे बंद करण्यात आलेले नियतन पूर्ववत सुरू करावे, देशभरातील परवानाधारक दुकानदारांना प्रतिक्विंटल ३०० रूपये कमिशन द्यावे किंवा दुकानदारांना ३० हजार रूपये मासिक वेतन द्यावे, एका सिलिंडरधारकाला चार लीटर केरोसीन द्यावे आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिन यांना पाठविण्यात आले.
आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष अरूण कुंभलकर, सचिव अनिल भांडेकर, रामदास पिपरे, काशिनाथ जेंगठे, सुरेश बांबोळे, सुषमा वालदे, इंदिरा मरगळे, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे, मोहन पाल, नाजूकराव जुमनाके, इंदुताई रणदिवे, डब्ल्यू.वाय.समर्थ, लता नैताम, बी.बी.मेश्राम, चंद्रभान दरडे, परशुराम बांबोळे, राजेंद्र सालोटकर आदी उपस्थित होते.