डाक विभागाचे मुख्य कार्यालय गडचिरोलीत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:53+5:302020-12-25T04:28:53+5:30
गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा ...
गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे प्रधान कार्यालय गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी गडचिरोलीवासीयांची मागणी आहे.
सुकन्या योजनेची जनजागृती करा
आष्टी : सुकन्या योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सदर योजनेची माहिती अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेची जनजागृती होणे गरजेचे आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
अहेरी : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाºया व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजुनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.
आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली- आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
भंगार काळीपिवळी टॅक्सी वाहतुकीवर
एटापल्ली : गेल्या अनेक दिवसापासून गडचिरोली तालुक्यासह जिल्ह्यातील दुर्गम भागात भंगार अवस्थेतील काळीपिवळी टॅक्सी विविध मार्गावर वाहतूक करीत आहेत.
मालेवाडा परिसर समस्यांच्या विळख्यात
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा द्यावा.
बाराही तालुक्यांना अग्निशमन यंत्र द्या
गडचिरोली : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्यावेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.