कसारीला आरोग्य उपकेंद्र द्या

By admin | Published: September 24, 2016 03:10 AM2016-09-24T03:10:28+5:302016-09-24T03:10:28+5:30

तालुक्यातील कसारी येथे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र्र निर्माण करावे,

Give health subcentres to Kasari | कसारीला आरोग्य उपकेंद्र द्या

कसारीला आरोग्य उपकेंद्र द्या

Next

पं.स. सभापतींची ग्रामीण विकास मंत्र्यांकडे मागणी
देसाईगंज : तालुक्यातील कसारी येथे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र्र निर्माण करावे, अशा मागणीचे निवेदन २१ सप्टेंबर रोजी देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रिती शंभरकर यांनी राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.
महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत कसारी या गावांमध्ये स्वतंत्र ग्राम पंचायत असून या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार या सारखे अनेक विकासात्मक पुरस्कार मिळाले आहेत. या गावाला स्वतंत्र पाणी पुरवठ्याची कोणत्याही प्रकाराची सोय नसून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या गावाला नेहमीच भेडसावत आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. तसेच कसारी हे गाव तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. कसारी पासून १० किमी दूरवर असलेल्या शंकरपूर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला हे गाव जोडलेला आहे, त्यामूळे या गावातील रूग्णांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे कसारी गावाची पाणीपुरवठा समस्या व आरोग्याच्या दृष्टिकोणातून उपकेंद्र देण्याची गरज आहे. ग्राम विकास विभागाने पाणी पुरवठा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी प्रिती शंभरकर यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली. नामदार पंकजा मुंडे यांनी कसारी गावाच्या या दोन्ही समस्या लक्ष घालून सोडविल्या जाईल, असे आश्वासन सभापती शंभरकर यांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Give health subcentres to Kasari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.