रूग्णालयाला सावित्रीबार्इंचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:20 PM2017-12-24T22:20:09+5:302017-12-24T22:20:19+5:30
इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले.
महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात फुले दाम्पत्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गडचिरोली येथे सुरू होणाºया महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, यासाठी माळी समाज संघटनेने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र आजपर्यंत या मागणीची अधिकारी व शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे माळी समाज संघटनेच्या पदाधिकाºयांनी रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला भारीप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती आंदोलन यांनी पाठींबा दर्शविला.
आंदोलनात माळी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरूषोत्तम निकोडे, उपाध्यक्ष पुरण पेटकुले, सचिव रमेश जेंगठे, सहसचिव मंगलदास कोटरंगे, भिमराज पात्रीकर, अशोक मांदाळे, हरिदास कोटरंगे, दत्तू चौधरी, शामराव सोनुले, धर्मानंद मेश्राम, पुरूषोत्तम लेणगुरे, नरेंद्र निकोडे, नेताजी गावतुरे, मुकाजी भेंडारे, भास्कर सोनुले, योगेश सोनुले, ईश्वर मोहुर्ले, शंकर चौधरी, यशवंत कोकोडे, मनोज सोनुले, चेतन शेंडे, आकाश निकोडे, सुनिल कावळे, प्रा. दशरथ आदे, संतोष मोहुर्ले आदी उपस्थित होते. त्याचबरोबर बीआरएसपीचे विवेक बारसिंगे, बहुजन मुक्ती आंदोलनाचे सुधीर वालदे, सोशल एज्युकेशन मुमेंट संघटनेचे धर्मानंद मेश्राम, राष्टÑीय ओबीसी युवा महासंघाचे रूचित वांढरे, भारीप बहुजन महासंघाचे प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, महिला जिल्हाध्यक्ष माला भजगवळी आदींनी पाठींबा दर्शविला व ते प्रत्यक्ष उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान रूग्णालयाच्या मुख्यद्वाराला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय असा फलक सुध्दा लावला. सदर फलक ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत यांनी रूग्णालयाला सावित्रीबार्इंचे नाव दिल्यास सावित्रीबाई मोठ्या होणार नसून त्यांच्या नावामुळे रूग्णालयाची ओळख वाढेल, असे प्रतिपादन केले.