कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:19 AM2017-09-10T01:19:14+5:302017-09-10T01:19:28+5:30

राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. मात्र अद्यापही शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

 Give immediate benefit to debt waiver | कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्या

कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्या

Next
ठळक मुद्देदिवाकर रावते : मोर्चे व आंदोलनातून शिवसेना सरकारवर दबाव निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. मात्र अद्यापही शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. सरकारने शेतकºयांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. या आंदोलन, मोर्चातून सरकारवर दबाव आण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांना केले.
जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्थानिक पटेल मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रपूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी, शिवसेना गडचिरोली जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, अहेरी विभागाचे जिल्हा प्रमुख विजय श्रृंगारपवार, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी प्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, वासुदेव शेडमाके, नंदू कुंभरे, विलास ठोंबरे, अविनाश गेडाम, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, युवासेनेचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, वाहतूक सेनेचे प्रमुख संतोष मारगोनवार, कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, सुनंदा आतला, घनश्याम कोलते, आशिष मिश्रा, संदीप दुधबळे, सुवर्णसिंग जांगी, राजगोपाल सुलभावार, संजय आकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रावते म्हणाले. कर्जमाफीच्या योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत सरकारने शेतकºयांना दिली आहे. मात्र इंटरनेट सुविधेअभावी ग्रामीण भागातील हजारो शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही ना. रावते यांनी केले. महाराष्टÑ सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ राज्यातील सर्व शेतकºयांना लवकर मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेची आहे. कर्जमाफी देण्याची कार्यवाही सरकारने गतीने करावी, या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात ११ सप्टेंबर रोजी सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व शिवसैनिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांकडेही जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे, असेही दिवाकर रावते यावेळी म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात गावपातळीवर बूथ प्रमुख व शाखा प्रमुखाची नेमणूक झाली पाहिजे. शिवसैनिकांनी गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी पक्ष संघटनांवर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल म्हणाले, शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकºयांच्या प्रश्नासाठी शिवसेनेने नेहमी आंदोलने केली आहेत, असे सांगितले.
याप्रसंगी महिला आघाडी प्रमुख छाया कुंभारे, अहेरी विभागाचे जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी आक्रमकतेने शिवसेनेची भूमिका मांडली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणारा एकमेव पक्ष म्हणजे, शिवसेना आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर बगमारे यांनी केले.

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा
शिवसेना हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देणारा पक्ष आहे. शिवसेना सत्तेत असूनही शेतकरी व गोरगरीबांच्या प्रश्नांवर शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्टÑात यानंतर होणाºया सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे ना. दिवाकर रावते यावेळी म्हणाले.
कार्यकर्त्यांचा हिरमोड
शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली. त्यानुसार सिरोंचा, अहेरी तालुक्यातील कार्यकर्ते गडचिरोलीत दाखल झाले. मात्र ना.रावते हे भाषण आटोपून ११.३० ला निघून गेले. भेट न झाल्याने दुरून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Web Title:  Give immediate benefit to debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.