पोलीस पाटलांना विमा कवच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:54+5:302021-06-25T04:25:54+5:30
कोरोनाकाळामधे बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना गावांतील शाळेमध्ये किंवा गृहविलगीकरणामध्ये १४ दिवस ठेवणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे. त्यांची ...
कोरोनाकाळामधे बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना गावांतील शाळेमध्ये किंवा गृहविलगीकरणामध्ये १४ दिवस ठेवणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे. त्यांची कोरोना चाचणी करणे व त्यांच्या आरोग्याची माहिती ठेवणे आदी सर्व कामे पार पाडली. त्यानंतर गावातील आठवडी बाजार भरू न देणे, गावातील लोकांना विनाकारण गावाबाहेर जाऊ न देणे, लग्नकार्यात व अंत्यविधीमध्ये गर्दी होऊ न देणे, याची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला देणे इत्यादी सर्व कामे पोलीस पाटलांनी २४ तास आपल्या परिवारासह आपल्या जीवाची पर्वा न करता पार पाडली.
२०२१ मध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. ग्रामीण भागांत जास्त प्रमाणात लागण झाली व पोलीस पाटलांची जबाबदारी पुन्हा वाढली. गावातील लोकांची कोरोना चाचणी करणे, त्यांना कोविड केअर सेंटरला भरती करणे, ग्रामस्तरीय समितीच्या मीटिंग घेणे व सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लसीकरण करवून घेणे ही सर्व कामे करताना गावातील लोकांचा विरोध सहन करावा लागला. जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे शासनाने यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी पोलीस पाटील असोसिएशन चामोर्शीचे तालुका अध्यक्ष श्रीरंग म्हशाखेत्री यांनी केली आहे.