मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:43 PM2017-12-30T23:43:37+5:302017-12-30T23:43:48+5:30

जिल्ह्यातील मागासर्गीय विद्यार्थ्यांची मागील तीन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, ......

Give pending scholarship to backward class students | मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती द्या

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती द्या

Next
ठळक मुद्देशिष्टमंडळ भेटले : समाजकल्याण आयुक्तांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील मागासर्गीय विद्यार्थ्यांची मागील तीन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने समाजकल्याण आयुक्त गावतुरे यांच्याकडे चर्चेदरम्यान करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ तसेच भाजप ओबीसी आघाडीचे शिष्टमंडळ आ. डॉ. देवराव होळी यांच्या समवेत समाजकल्याण आयुक्तांना भेटले. भेटीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या तिन्ही सत्राची शिष्यवृत्ती फ्रीशिप विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. काही विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाकारल्यामुळे अडचणींचाही सामना करावा लागला होता. त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
चर्चेदरम्यान भाजप ओबीसी आघाडीचे गावंडे, भास्कर बुरे, नंदू नाकोडे, सुनील पारधी, ओबीसी महासंघाचे रूचित वांढरे, सूरज डोईजड, किरण कटरे, करण ढोरे, विपुल मिसार, साई सिलमवार, लोकमान्य बरडे व ओबीसी बांधव उपस्थित होते.

Web Title: Give pending scholarship to backward class students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.