‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

By admin | Published: July 31, 2014 12:02 AM2014-07-31T00:02:28+5:302014-07-31T00:02:28+5:30

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे

Give the post of Vice Chancellor to the OBC | ‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

Next

रिक्त पद त्वरित भरा : राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असल्याने विद्यापीठाच्या कामात अधिकाधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. विद्यापीठातील रिक्त असलेले कुलगुरूचे पद भरतांना जिल्ह्यातील ओबीसींना प्राधान्य देऊन कुलगुरूपदी ओबीसीची नियुक्ती करावी व रिक्त असलेले पद भरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातू केली आहे.
गडचिरोली-चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. जिल्ह्यातील तिनही आमदार आदिवासी आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकारी आदिवासी संवर्गाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही. परिणामी ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ओबीसींना शासकीय नोकरी व इतर कामात पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नैराश्य पसरले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजात अनेक तज्ज्ञ, उच्च विद्याविभूषित लोक आहेत. याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाण असणारे अनेक प्राध्यापक, डॉक्टरेट पदव्या प्राप्त करणारीही मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यास जिल्ह्यातील ओबीसी समाजातील अनेक उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे कुलगुरूचे रिक्त पद भरतांना ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, असेही चलाख यांनी म्हटले आहे.
प्रथम कुलगुरूपदी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवाराची नियुक्ती व्हावी, यासाठी ओबीसी बहुजन महासंघाच्यावतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. मात्र काही समाजाच्या राजकारण्यांनी ओबीसी समाजाची मागणी धुडकावून लावली होती. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसी उमेदवाराची नियुक्ती केल्यास संपूर्ण ओबीसी समाजासह इतर समाजालाही न्याय मिळू शकतो. विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसींची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी केली आहे.

Web Title: Give the post of Vice Chancellor to the OBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.