काेविड याेद्ध्यांना पदभरतीत प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:21+5:302021-09-09T04:44:21+5:30

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानांतर्गत ३० ऑगस्ट राेजी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून, निवड व प्रतीक्षा यादी ...

Give preference to cavities | काेविड याेद्ध्यांना पदभरतीत प्राधान्य द्या

काेविड याेद्ध्यांना पदभरतीत प्राधान्य द्या

Next

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानांतर्गत ३० ऑगस्ट राेजी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून, निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, परंतु या यादीमध्ये जिल्ह्यातील बऱ्याच कोविड योद्ध्यांना वगळण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून आपल्या जीवाची पर्वा न करता, सतत व प्रामाणिकपणे सेवा करणारे आरोग्यसेवक व अधिपरिचारिकांना यामध्ये संधी देणे गरजेचे हाेते. तसे शासनाचे धोरणही आहे, परंतु हेतुपुरस्सर वगळण्यात आले. काेविड याेद्ध्यांच्या अनुभवाचा फायदा जनतेला व्हावा, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानातील पदभरतीत अधिपरिचारिका व आरोग्यसेवक या पदावर अनुभवी कोविड योद्ध्यांना प्राधान्य देण्यात यावे. सदर पदभरती निवड प्रक्रिया रद्द करून, यावर काहीच कार्यवाही न केल्यास संपूर्ण कोविड योद्धे जिल्हा परिषदेच्या पटांगणात आत्मदहन करतील, असा इशारा करिष्मा गाेवर्धन, अश्विनी वालदे, पूजा व्यास, काजल गाेंडाणे, नीलिमा अंबादे, प्राची नारनवरे, फुलझरी मंडल, तेजस्विनी लाकडे, संदीप तुमनुरी, स्नेहल वाकडे, मंगेश ढवले यांनी दिला.

Web Title: Give preference to cavities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.